राज्यसभेसाठी हुसेन दलवाईंची उमेदवारी निश्चित

July 9, 2011 5:29 PM0 commentsViews: 4

09 जुलै

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित झाला आहे. हुसेन दलवाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा रिकामी झाली होती. याविषयी आज दिल्लीत चर्चा झाली. आणि दलवाई यांचं नाव निश्चित झालं. राज्यसभेसाठी 11 जुलैला मुंबईत अर्ज दाखल केला जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याविषयी आज दिल्लीत चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश आणि ऑस्कर फर्नांडीस यांच्यात बैठक पार पडली. राज्यसभेसाठी 11 जुलैला मुंबईत अर्ज दाखल केला जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. प्रादेशिक आणि सामाजिक समतोलाचा विचार करूनच उमेदवार ठरवला जाईल असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अखेर रात्री 10 च्या सुमारास हुसेन दलवाई यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

close