घरात घुसलेला बिबट्या गावकर्‍यांनी पकडला

July 10, 2011 12:32 PM0 commentsViews: 3

10 जुलै

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवसू गावात घरात घुसलेल्या एका बिबट्याला गावकर्‍यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं. शुक्रवारी पहाटे हा बिबट्या एका घरात घुसला होता. त्यामुळे शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून त्याला पकडण्याचे प्रयत्न गावकर्‍यांनी सुरू केले होते.

वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात यायला बिबट्या तयार नसल्याने त्याला गावकर्‍यांनी अखेर पेटती मशाल दाखवून पिंजर्‍यात येण्यास भाग पाडलं. आणि अखेर चार ते पाच तासाच्या प्रयत्नांनंतर गावकर्‍यांनी बिबट्याला पकडले. आणि विशेष म्हणजे बिबट्याला पकडल्या नंतर त्याची गावातून छोटेखानी मिरवणूकही काढली.

close