अकोलेत कडकडीत बंद

July 10, 2011 10:11 AM0 commentsViews: 7

10 जुलै

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील वीरगावमध्ये झालेल्या दरोडे प्रकरणात चौवीस तासांनंतरही आरोपी मोकाटच आहेत. दरोडेखोरांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज, सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली. पोलिसांच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ 3 वाजता एक निषेध सभाही होणार आहे. सकाळपासून अकोले शहरात कडकडीत बंद आहे.

रविवार असल्यामुळे शाळा, कॉलेज सुद्धा बंदच आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी या दरोड्याचा तपास एन.अंबिका या महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवला. आरोपींचे धागेधोरे मिळाल्यामुळे दरोडेखोर लवकरच गजाआड होतील अशी माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली. दरम्यान अहमदनगर जिल्हात दरोड्यांचे सत्रं सुरुच आहे. काल रात्री अगस्ती मंदिरातून चोरट्यांनी 1 किलो चांदीच्या पादुका लंपास केल्या आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या वीरगावमध्ये दरोडेखोरांनी टेमगिरी मळ्यात टाकलेल्या दरोड्यात टेमगिरी कुटुंबातल्या दोन महिलांवर दरोडेखोरांनी बलात्कार केला. तसेच दोन वृद्ध महिलांना जबर मारहाण केली. 8-9 दरोडेखोरांच्या टोळक्यानं महिलांच्या अंगावरचे पाच तोळं सोनं आणि दशक्रियाविधीसाठी 10 हजार रूपये लुटून नेले.

कुटुंबातल्या भिकाजी टेमगिरे यांचे दहा दिवसांपूर्वीच निधन झालंय. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी घरात आलेल्या महिलांवर दरोडेखोरांनी हा अत्याचार केला. दरोडेखोरांच्या या कृत्यानंतर वीरगाव परिसरात भितीचं वातावरण आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या टेमगिरी कुटुंबाला नुकसाभरपाई मिळावी अशी मागणी या अत्याचारातून बचावलेल्या लोकांनी केली. राष्ट्रवादीच्या जिल्हा कमिटीकडून टेमगिरी कुटुंबाला एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

close