बेकायदेशीर वाळू तस्करीचा रस्त्यावर झोपून केला निषेध

July 10, 2011 12:45 PM0 commentsViews: 4

10 जुलै

बेकायदेशीर वाळू तस्करीविरुद्ध दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूरच्या गावकर्‍यांनी अनोखं आंदोलन केलं. त्यांनी रस्त्यावर झोपून बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केला. सोलापूर जिल्हात बेकायदेशीर वाळू तस्करीविरुध्द तक्रारी वाढत आहेच पण तरीही प्रशासन काहीच कारवाई करत नाही असा गावकर्‍यांचा आरोप आहे.

कुसूर गावातल्या वाळूपात्रातून दररोज शेकडो ट्रक वाळू उपसा केला जातो. रात्रीही हे काम सुरू असतं. त्यामुळे रस्ते खराब झाले आहे. गावकर्‍यांना इतरही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. स्थानिक आमदार दिलीप माने यांचे भाऊ सतीश माने यांच्या नावावर वाळू ठेका आहे.

त्यामुळेच पोलीस तक्रार दाखल करत नाही. उलट तक्रार करणार्‍यांवरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो असा आरोप गावकरी करत आहे. संतापलेल्या गावकर्‍यांनी आता आमदारांनाच गावबंदीचा इशारा दिला.

close