ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

July 10, 2011 10:28 AM0 commentsViews: 6

10 जुलै

ज्येष्ठ समाज सेविका साधनाताई आमटे यांच्या पार्थिवावर आज आनंदवनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. साधनाताईंचे शनिवारी संध्याकाळी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्या कॅन्सरने आजारी होत्या. 1946 साली बाबा आमटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि त्यानंतर बाबांसोबत त्यांनीही आपलं आयुष्य समाजकार्यासाठी वाहून दिलं. आनंदवन उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. 'समिधा' हे त्यांचं आत्मचरित्र खुपच गाजलं. 2008 मध्ये बाबा गेल्यानंतर तीन वर्ष त्यांचा मुक्काम आनंदवनातच होता. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली तीही आनंदवनातच.

close