विलासरावांच्याही पत्त्यावर वेंगसरकर ग्रुपचा आक्षेप

July 10, 2011 10:51 AM0 commentsViews: 2

10 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस नवीन गोष्टी बघायला मिळत आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख यांनी उमेदवारी भरली. पण आता विलासराव देशमुखही या निवडणुकीसाठी अपात्र असल्याचे वेंगसरकर ग्रुपने म्हटलं आहे.

वेंगसरकर ग्रुपमधून कमिटी मेंबरसाठी आपली उमेदवारी भरणार्‍या नदिम मेमन यांनी विलासराव देशमुखांनी नमुद केलेल्या पत्त्यावर आक्षेप घेतला आहे. सरकारी वेबसाईटवर विलासरावांचा पत्ता हा लातूर जिल्ह्यातील बाभळगावचा असल्याचे मेमन यांचं म्हणणं आहे. याबाबत वेंगसरकर ग्रुप सध्याचे एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दाद मागणार आहे. आणि जर त्यांनी यासंदर्भात नकार दिला तर कोर्टात जाण्याची तयारीही वेंगसरकर ग्रुपने दर्शवली आहेते.

close