पंढरपुरात 363 किलो बनावट खवा जप्त

July 10, 2011 4:14 PM0 commentsViews: 4

10 जुलै

आषाढी एकादशीला उद्यावर आलेली असताना पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर बनावट खवा जप्त करण्यात आला आहे. 363 किलो बनावट खवा पोलिसांनी जप्त केला. विठ्ठल मंदिर परिसरातूनच हा बनावट खवा जप्त करण्यात आला. यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आषाढीसाठी पंढरपूरात लाखो भाविक येत असतात. या काळात प्रचंड प्रमाणात प्रसादाची विक्री होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट खवा सापडल्यामुळे भाविकांमध्येही खळबळ उडाली. भाविकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसखोरांविरूध्द कडक कारवाईची मागणीही वारकरी करत आहे.

close