‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ दैनिकाचा गुडबाय

July 10, 2011 5:11 PM0 commentsViews: 5

10 जुलै

168 वर्ष जुन्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या टॅब्युलॉइडचा आज शेवटचा अंक प्रकाशित झाला. शेवटचा अंक मिळवण्यासाठी ब्रिटेनमध्ये एकच झुंबड उडाली होती. आज या टॅब्युलॉइडची किंमत 1 पाऊंड होती. आजच्या शेवटच्या अंकाची सुरुवात जगातला सर्वोत्तम वर्तमानपत्र 1843 ते 2011 अशी होती तर शेवटी फक्त थँक्यू, गुडबाय लिहण्यात आलं होतं. आम्ही आमचा मार्ग चुकलो असंही वर्तमानपत्राच्या अग्रलेखात लिहण्यात आलं. पेपरने हेरच्या मदतीने मोठ्या व्यक्तिंचे फोन हॅक केल्याचं समोर आलं होतं. दबाव वाढल्यानंतर द न्यूज ऑफ द वर्ल्डचे संपादक जेम्स मरडॉक यांनी हा पेपर बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

close