बॉम्बस्फोटामुळे गुवाहाटी -पुरी एक्सप्रेस घसरली

July 10, 2011 5:53 PM0 commentsViews: 5

10 जुलै

आजचा रविवार हा पुन्हा एकदा अपघातवार ठरला आहे. उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या कालका एक्सप्रेसला अपघात झाल्यानंतर आसाममध्ये ही गुवाहाटी- पुरी एक्सप्रेसला अपघात झाला आहे. हा अपघात बॉम्बस्फोटामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की रेल्वेची 5 डबे रूळावरून घसरली. या अपघातात 100 प्रवासी जखमी झाले आहेत. आसाम मधल्या कामरूप जिल्ह्यात हा अपघात झाला. गाडीचे 5 डबे आणि इंजिन घसरले. घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेतली. बॉम्बशोधक पथकाचे पाचरण करण्यात आले आहे.

close