दरोडा प्रकरणी 3 जणांना अटक

July 11, 2011 9:38 AM0 commentsViews: 2

11 जुलै

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. संतोष पंडित, बाबुशा काळे आणि गोरख भोसले अशी आरोपींची नावं आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील पोळगाव येथून ही अटक करण्यात आली.

श्रीगोंद्याचा सराफ संतोष पंडित त्यांच्या पालावर सोनं खरेदी करण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. यांच्याजवळ सापडलेले सोन्याचे मणी टेंभगिरी कुटुंबातल्या महिलांनी ओळखले आहेत. या दरोड्याच्या तपासासाठी मुंबईहून पथक आल्याची माहिती पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी दिली. वीरगावला घटनास्थळावर जाऊन त्यांची गुन्ह्याची माहिती घेतली.

close