महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडं

July 11, 2011 9:48 AM0 commentsViews: 12

11 जुलै

आज आषाढी एकादशी.. पंढरपूरच्या वारी सोहळ्याचा आज कळस…अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री या नात्याने श्री विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली.

त्यावेळी हरिनामाच्या जयघोषात विठठ्ल रुक्मिणी मंदिर दुमदुमून गेलं होतं. पहाटे 2.30 ते 3.00 च्या दरम्यान हा महापूजेचा सोहळा रंगला. शुद्ध जल आणि दुग्धाभिषेकाने विठ्ठलाची महापूजा पार पडली. त्यानंतर देवी रुक्मिणीची महापूजाही थाटात पार पडली.

महाभिषेकानंतर रुक्मिणीला केशरी वस्त्राने नटवण्यात आलं होतं. त्याचबरोबर अलंकारांनीही सजवण्यात आलं. महापूजेच्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, तसेच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारीही हजर होते.

close