चोरट्यांचा खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही फटका ; रेल्वेमधून पर्स केली लंपास

July 11, 2011 9:59 AM0 commentsViews: 4

11 जुलै

राज्यातल्या चोरट्यांचा फटका खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीलाही बसला. रविवारी, नऊ जूलैला सत्वशीला चव्हाण पुण्याहून जळगावला जात असताना चोरट्यांनी ट्रेनमधून त्यांची पर्स लंपास केली. जळगावला उतरल्यावर सत्वशीला यांच्या ही गोष्ट लक्षात आली.

कोल्हापूर – गोंदिया या 'महाराष्ट्र एक्सप्रेस'च्या एसी डब्यातून प्रवास करताना ही चोरी झाली. सत्वशीला यांच्या पर्समध्ये 40 हजार रुपयांची रोख होती. चोराचा तपास चालू आहे. पण आत्तापर्यंत अधिकृतरीत्या कोणतीही तक्रार नोंदवण्यात तरी रेल्वे पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा दाखल केला नाही. विषेश म्हणजे त्यांच्या बरोबर दोन सुरक्षा रक्षक असतानाही ही चोरी झाली.

close