गिरणी कामगारांच्या पाठिशी राहण्याचे उध्दव ठाकरेंचे आश्वासन

July 11, 2011 10:49 AM0 commentsViews: 3

11 जुलै

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी आमदारांची एक कोअर कमिटी स्थापन करणार आहे. ही कमिटी वेळोवेळी हा प्रश्न लावून धरेल. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले आहे. गिरणी कामगारांच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार कर्मचारी निवाराचे किशोर देशपांडे,महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे जयप्रकाश भिलारे, श्रमिक संघटनेचे बी.के. आंबरे, गिरणी कामगार सेनेच्या मंदाकिनी चव्हाण यांचा यामध्ये सहभाग आहे. 'तुम्ही हाक मारली, आम्ही तुमच्या सोबत आहोत', असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.

गिरणी कामगारांच्या घरांसदर्भात ऍक्शन प्लॅन द्या. प्लॅन पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करु या विषयाचा एकदाचा शेवट करु आता विविध संघटनांचे नेते एकत्र आले आहात तर एकजूट कायम ठेवा" असंही उद्धव यांनी सांगितले.

close