‘देल्ही बेली’चा शो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला

July 11, 2011 11:01 AM0 commentsViews: 3

11 जुलै

देल्ही बेली चित्रपटाच्या विरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आणि दोन थिएटरमधला सिनेमा बंद पाडला. दिल्ली-बेली चित्रपटात अश्लील संवाद वापरले गेलेत. त्यामुळे हा सिनेमा चालू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. सुरवातीला उमा टॉकीज येथे सुरु असलेला सिनेमा बंद पाडला. सिनेमाची पोस्टर्स फाडली आणि त्यानंतर पार्वती मल्टिप्लेक्स येथे सुरु असलेला देल्ही बेली सिनेमा बंद पाडला.

close