वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी

July 11, 2011 3:21 PM0 commentsViews: 5

11 जुलै

मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातही आज पहाटेपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.पहाटेचा प्रहर सुरु झाला तोच विठूरायाच्या जयघोषाणाने. त्याचवेळी श्रीविठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रात्रभरात दिंड्या मुंबईच्या या वडाळ्याच्या मंदिरात दाखल होत होत्या. दरम्यान मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

close