रमाबाई कॉलनीत हत्याकांडाचा झालेल्या निषेधार्थ रॅली

July 11, 2011 3:49 PM0 commentsViews: 4

11 जुलै

11 जुलै 1997 ला मुंबईतल्या रमाबाई कॉलनीत झालेल्या हत्याकांडाचा निषेध करत या हत्याकांडात मरण पावलेल्या लोकांना अभिवादान करण्यासाठी युथ रिपब्लिकनच्या वतीने एक रॅली काढण्यात आली. चेंबूर इथल्या आंबेडकर गार्डन पासून ते रमाबाई कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या हत्याकांडातील पिडितांना योग्य न्याय मिळाला नसल्याचे सांगत लोकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये ऍट्रॅासिटी कायद्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीही केली जात असल्याचे युथ रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

close