7/11 बॉम्ब स्फोट प्रकरणाचा खटला अंतिम टप्यात

July 11, 2011 4:08 PM0 commentsViews: 36

11 जुलै

मंुबईत 7 जुलै 2006 साली रेल्वेत झालेल्या सिरीअल बॉम्ब स्फोट प्रकरणाचा खटला अंतिम टप्यात आला आहे. रेल्वेत झालेल्या सिरीअल बॉम्ब स्फोट प्रकरणाला आज पाच वर्ष पुर्ण झाली आहे. तर या प्रकरणाच्या खटल्याला तीन वर्षे झाली. मोक्का कोर्टाचे न्यायाधीश वाय डी शिंदे यांच्या कोर्टात हा खटला सुरु आहे.

मधल्याकाळात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशावरुन हा खटला 2 वर्षे चालवण्यात आला नव्हता. पण, स्थगिती उठल्यानंतर जून 2010 पासून हा खटला पुन्हा वेगाने सुरु झाला. या प्रकरणात एकूण 13 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. तर या प्रकरणात दोन हजार पेक्षा जास्त साक्षीदार असून 145 महत्वाचे साक्षीदार आहेत. 145 पैकी 110 साक्षीदारांची साक्ष कोर्टात झाली आसून इतर 35 साक्षीदारांची साक्ष लवकरच पुर्ण होईल असं या खटल्यातील वकिलांचं म्हणणं आहे.

close