‘एमसीए’च्या मैदानात लालचंद राजपूत यांचे स्वतंत्र पॅनेल

July 11, 2011 12:33 PM0 commentsViews: 1

11 जुलै

एमसीए निवडणुकीत आता आणखी एक नवं पॅनेल येतं आहे. क्रिकेटर लालचंद राजपूत यांनी आपलं स्वतंत्र पॅनेल उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. राजपूत हे मुळचे विलासराव देशमुख यांच्या गटातील आहेत. आणि संयुक्त सचिवपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. पण आज अचानक राजपूत यांनी स्वतंत्र पॅनेल उभं करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लालचंद राजपूत यांच्या पॅनेलमध्ये 8 उमेद्‌वार असण्याची शक्यता आहे. आणि आज संध्याकाळी राजपूत आपल्या पॅनेलची अधिकृत घोषणा करणार आहेत. एमसीए निवडणुकीसाठी सध्या 17 पदांसाठी 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

close