राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

July 11, 2011 12:58 PM0 commentsViews: 2

11 जुलै

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या दिवाणी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर औरंगाबाद शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या तसेच अनेक वाहनांची तोडफोड ही करण्यात आली होती. या प्रकरणात कन्नड न्यायालयात खटला सुरू आहे. त्यानंतर 7 जुलैला या प्रकरणाची पुढची सुनावणी होती. त्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंना हे वॉरंट बजावले.

close