गिरणी कामगारांच्या लढ्यात मनसे ही सहभागी !

July 11, 2011 6:19 PM0 commentsViews: 3

11 जुलै

गिरणी कामगारांच्या मोर्चात मनसेही सहभागी होणार असं आश्वासन आज राज ठाकरेंनी गिरणी कामगार संघटनेला दिलं. येत्या पावसाळी अधिवेशनात गिरणी कामगारांचे प्रश्न हाच मुख्य मुद्दा असणार आहे असंही राज ठाकरे म्हणाले. त्यासाठी विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांची लवकरच भेट घेणार आहे असं ही राज यांनी यावेळी सांगितलं.

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून एक हाती लढा सुरू होता. कालच गिरणी कामगार संघटनेच्या सहा संघटनांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला यासाठी सर्व संघटना एक झाल्या आहे. आज शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आपला मोर्चा कृष्णकुंजकडे वळवला.

राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या पुढच्या वाटचालीची माहिती सांगितली.यावर राज ठाकरे यांनी आपण आणि महाराष्ट्र नव निर्माण या मोर्चात सहभागी होणार आहोत. मुंबई बाहेर राज्यातून परप्रांतीय येतात त्यांना इथं फूकटात घर मिळतात. पण गिरणी कामगारांनी मिळत नाही. या विरोधात आपण गिरणी कामगारांना सोबत आहोत असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

close