पानशेत धरण फुटीला 50 वर्ष ; पुरग्रस्त अजूनही मदतीपासून वंचित

July 12, 2011 10:25 AM0 commentsViews: 162

गोविंद वाकडे , पुणे

12 जुलै

पुण्यातील पानशेत धरण फुटून शहर पुरात बुडालं होतं. शेकडो लोक बेघर झाले होते. महाप्रलयाच्या घटनेला आज आता 50 वर्ष पूर्ण होत आहे. पण वयासह व्यथांची पन्नाशी गाठणारे पूरग्रस्त अजूनही मदतीपासून वंचित आहेत.

12 जुलै 1961 च्या रात्रीत निसर्गाच्या रौद्ररुपाचे प्रत्यक्षदर्शी ठरलेले शिवाजी ठोंबरेंनी त्यांची आठवण सांगताहेत. पुराने घातलेल्या थैमानाने अनेकांचे प्राण घेतले. कित्येकांचे संसार उद्धवस्त केले. त्यावेळी अवघ्या 12 वर्षांच्या असलेल्या सिंधुताई तर पुराच्या पदरात पडल्या होत्या. पण त्या वाचल्या, पूर परिस्थितीने निर्माण केलेली भीती आजही सगळ्यांच्या डोळ्यात कायम आहे.

एकीकडे धरण फुटल्याने शहरात पाणी घुसलं होतं. तर दुसरीकडे आभाळ कोसळत होतं. अशा स्थितीत तब्बल तीन दिवस नागरिक अन्न पाण्याशिवाय उंच टेकड्यावर बसून होते. पाण्याचा जोर कमी झाला. लोक घराकडे परत आले. पण त्यावेळेला उरलं होतं ते केवळ पाणी-चिखल आणि फक्त पाणी. या पूरग्रस्तांचे पन्नास वर्षांनंतरही सरकारने पुनर्वसन केलेलं नाही.

गेल्या 10 वर्षांपासून मंगेश खराटे या पूरग्रस्तांची कैफियत मांडताहेत. पण अजूनही त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही. पन्नास वर्षांनंतरही पूरग्रस्तांच्या प्रश्नांबाबत अंतिम अहवाल सरकार दरबारी पाठवण्यात आला. पुढे हा अहवाल मंत्रालयात गेल्यानंतर त्याची सरकारने दखल घ्यावी हीच अपेक्षा.

close