अकोले दरोडा प्रकरणी 2 पोलीस अधिकारी निलंबित

July 12, 2011 10:46 AM0 commentsViews: 6

12 जुलै

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अमानुष घडलेल्या दरोड्याप्रकरणी अकोले पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रकाश पाटील आणि ठाणे अंमलदार सलिम शेख निलंबित करण्यात आलं आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. कामात हलगर्जी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काल याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close