राज्यात 260 सोनोग्राफी मशीन्स सील

July 12, 2011 5:43 PM0 commentsViews: 9

12 जुलै

लिंगनिदान करुन त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या करण्यास मदत करणार्‍या डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्सविरोधात राज्य सरकारने एक धडक मोहीम सुरु केली. या मोहीमेअंतर्गत तब्बल 260 सोनोग्राफी मशीन्स सील करण्यात आल्या आहे. तर सुमारे एक हजार मशीन्स या अनधिकृतपणे सुरु असल्याचाही धक्कादायक निष्कर्ष या मोहीमेतून बाहेर आला. जन्माआधीचे मारले जाणारे मुलींचे गर्भ वाचवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.

2011 च्या प्रोव्हिजनल सेन्सस रिपोर्टनंतर महाराष्ट्रातली धक्कादायक वस्तुस्थिती पुढे आली. तब्बल 14 जिल्ह्यात मुली जन्माआधीच मारल्या जात होत्या. त्यानंतर बीडमध्ये नाल्यात फेकलेल्या स्त्री भ्रूणांनी राज्यसरकारला जाग आणली आणि 17 जूनपासून सोनोग्राफी मशीन्सविरोधातली धडक मोहीम सुरु झाली.

धडाका धडक मोहिमेचा

विभाग तपासलेल्या मशीन सील मशीन1- मुंबई-ठाणे 1563 732- नाशिक 1010 43 3- औरंगाबाद 417 26 4- लातूर 440 505- अकोला 383 13 6- पुणे 577 187- कोल्हापूर 695 38- नागपूर 528 23

या धडक मोहिमेअंतर्गत सील झालेल्या मशीनपैकी 11 प्रकरणात कोर्टात केस दाखल झाल्या आहे. तर 24 प्रकरणी कोर्टात केसेस दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झालीय. सर्वच प्रकरणात दावे लवकर दाखल करण्याची मागणी आता कार्यकर्त्यांनी केले.

पुण्यात पाच सोनोग्राफी सेंटर सील

पुण्यात पिंपरी-चिंचवड परिसरात विनापरवाना चालवल्या जात असलेल्या पाच सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ.राजशेखर अय्यर आणी त्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून चालवल्या जाणार्‍या एका हॉस्पिटलवरही कारवाई करण्यात आली. कामगार हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले आहेत. दरम्यान शहरातल्या इतर 4 खाजगी रुग्णालयातही अशाच प्रकारे लाइसेंस शिवाय सोनोग्राफी सेंटर चालवले जात असल्याचे उघड झाल्याने हे सेंटर सिल करण्यात आलेत.

close