अकोले दरोडा प्रकरणी शिवसेना,रिपाईचा मूक मोर्चा

July 12, 2011 2:50 PM0 commentsViews: 2

12 जुलै

अहमदनगर येथील अकोले तालुक्यात वीरगावात पडलेल्या दरोड्याप्रकरणी शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मूक मोर्चा काढला. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तत्काळ अटक आणि अत्याचारित महिलांना योग्य मोबदला देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात 23 जुलैला राज्यभर सरकारची अंतयात्रा काढणार असल्याचे शिवेसना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

close