तहसीलदाराला मारहाणीमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना फटका

July 12, 2011 4:22 PM0 commentsViews: 6

12 जुलै

मेडिकल ऍडमिशनसाठी स्क्रुटीनी फॉर्म सबमिट करण्याची आज शेवटची तारीख होती. पण वाडा तहसीलदार मारहाण प्रकरणामुळे तहसीलदार कार्यालयात आज कामबंद आंदोलन केलं होतं. त्याचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला. स्क्रुटीनी फॉर्म सोबत क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करायचं होतं.

पण तहसीलदार कार्यालयातल्या कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर सर्टीफिकेट मिळाले नाही. त्यामुळे आज जे.जे. हॉस्पिटलबाहेर जमलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी डीन. तात्याराव लहानेंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा करत फॉर्म सबमिशनची तारीख वाढवून देण्याची विद्यार्थी-पालकांनी मागणी केली. दरम्यान, मेडिकलची पहिली प्रवेश यादी 18 जुलैला लागणार आहे.

close