गुरुदास कामत ‘नॉट रिचेबल’

July 13, 2011 9:39 AM0 commentsViews: 22

13 जुलै

काल झालेल्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलावर नाराज असलेले गुरुदास कामत यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. गुरुदास कामत आहेत कुठे ? अशीच चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान आज दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. काल झालेल्या मंत्रिमंडळातल्या फेरबदलात पक्षाने दिलेल्या पदामुळे नाराज झालेल्या गुरूदास कामत यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.

गुरुदास कामतांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या आदेशानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. आज झालेल्या शपथविधीला कामत गैरहजर राहिल्याने हायकमांडने संतप्त होऊन हा निर्णय घेतला. कामत यांना यापूर्वीच हायकमांडने इशारा दिला होता. कामत केंद्रीय गृह आणि दूरसंचार राज्यमंत्री होते. विस्तारानंतर कामतांकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला होता.पण यावर नाराजी व्यक्त करत कामत आज शपथवीधीला गैरहजर राहिले.

खासदार मिलिंद देवरा यांनी आज आपल्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्लीत संचारभवन इथे स्विकारली. वडिल मुरली देवरा यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे दूरसंचार खात्याच्या राज्यामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद आधी मुंबईच्याच गुरुदास कामत यांच्याकडे होतं. सध्या गुरुदास कामत नाराज असून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचाही राजीनामा दिला. पण कामत यांच्याशी आपलं कुठलंही वैर नसल्याचे मिलिंद देवरा यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.

close