कोल्हापूरमधली त्रिपुरारी पौर्णिमा

November 13, 2008 2:35 PM0 commentsViews: 57

13 नोव्हेंबर, कोल्हापूर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. या दीपोत्सवामुळं पंचगंगा घाट परिसर पहाटे उजळून निघाला होता. पंचगंगा विहार मंडळ दरवर्षी दिपोत्सव साजरा करतं. यंदा 45 हजार दिवे या परिसरात लावण्यात आले होते. हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी पहाटेच्या थंडीतही मोठी गर्दी केली होती. दीपोत्सवामध्ये दीपनृत्यकलाकार महेश बगाडे यानसगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. महेश गेल्या आठ वर्षांपासून दिपोत्सवामध्ये आपली कला सादर करत आहे. महेशनं यावेळी 101 पणत्या घेऊन नृत्य केलं. पुढच्या वर्षी एक्कावन्न हजार पेक्षा जास्त दिवे लवून दिपोत्सव साजरा करण्याचा निर्णय पंचगंगाविहारच्या आयोजकांनी घेतला आहे.

close