अकोल्यात 50 लाखांचे बनावट बियाणे जप्त

July 13, 2011 10:07 AM0 commentsViews: 5

13 जुलै

अकोला जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत बनावट बियाण्यांच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यात 50 लाख रुपयांचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरू होती. भूमीधन सीड्स कारखान्यावर हा छापा टाकण्यात आला.

कारखान्यात रिजेक्ट झालेलं सोयाबीनच बियाण पाकिट बंद केलं जात होते. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या बॅगमधील रिजेक्ट झालेले बियाणे भूमीधनच्या बॅगमध्ये भरले जात होते. ही पोती ट्रकमध्ये भरली जात असताना कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली. पण अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

close