साईचे वैद्यकीय अधिकारी नंदी यांना सेंटरमध्येच मारहाण

July 13, 2011 12:20 PM0 commentsViews: 2

13 जुलै

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे अर्थात साईचे एक वैद्यकीय अधिकारी संजीब नंदी यांना नवी दिल्लीतल्या साई सेंटरमध्येच मारहाण झाली. तिथल्या सुरक्षा रक्षकांनीच नंदा यांच्यावर हात उचला. नंदा यांनी काही दिवसांपूर्वी साईत डोपिंगचं एक रॅकेट चालतं असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर डोपिंग प्रकरणाची चौकशी करणार्‍या मुकुंद मुदगुल यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच आज ते साई कार्यालयात आले होते. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं. आणि त्यांच्याशी झालेल्या बोलाचालीनंतर रक्षकांनी सरळ नंदी यांना मारहाण केली असं समजतंय.

close