पोलिसांनी जप्त केलेल्या टँकरला गळती

July 13, 2011 8:27 AM0 commentsViews: 11

13 जुलै

लोणावळ्याजवळ टाकवे खुर्द गावात रस्त्याला लागून सात वर्षापासून पोलिसांनी पकडलेले टँकर उभे आहेत. यात काळं तेल आणि आग लागणारे केमिकल्स आहेत. सात वर्ष हे टँकर इथंच राहिल्याने आता ते सडून गळायला सुरू झाले आहेत. सर्व केमिकल आणि काळं तेल शेजारच्या शेतांमध्ये जात आहे.

तसेच नाल्यांमधून इंद्रायणी नदीपर्यंत पोचलं आहे. भेसळखोरांवर कारवाई करून हे टँकर पुणे ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले होते. भेसळ माफियांवर गुन्हा दाखल करुन त्यांची केस चालू आहे. टँकर पकडल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं.

तसं न होता सात वर्षांपासून टँकर रस्त्यावरच उभे असल्याने आता धोका निर्माण झाला. टँकर खरतर सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे होते. पण ते या गावाच्या रस्त्यालालगूनच आहेत. आज सातवर्षांनी हे टँकर सडल्यामुळे गळण्यास सुरुवात झाली आहे. सर्व केमिकल आणि काळं तेल शेजारच्या शेतात जात आहे. तसेच लगतच्या नाल्यामधून इंद्रायणी नदीपर्यंत पोचले आहे.

close