गोंदियात आश्रमशाळेच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

July 13, 2011 10:27 AM0 commentsViews: 6

गोपाल मोटघरे, गोंदिया

13 जुलै

गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त भागातील एका निवासी आश्रमशाळेला काही दिवसापूर्वी आमदांनी अचानक भेट दिली. आणि आश्रमशाळेची अवस्था पाहून आमदारसाहेब ही हैराण झाले.

गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागातली निवासी आश्रमशाळा, 1 ली ते 10 वी पर्यंत आदिवासी मुलं या शाळेत शिकतात. आश्रमशाळेत पाणीपुरवठ्याची ही अवस्था झाली. वॉटर टँकला भोकं पडली आहे, नळावरुन तोट्या गायब आहेत. शौचालयाच्या शिट्सची अवस्था वेगळी नाही, शिट्स फुटल्यात दरवाजे गायब आहेत. मुलांना प्रसाधनाकरता उघड्यावर जावं लागतं. स्विपरची पोस्ट नसल्याचं केंद्र प्रमुखाचं म्हणणं आहे.

मुलाना या इथं साधी झोपायचीही सोय नाही. हजेरीपटावर अनेक विद्यार्थ्यांची नावं आहेत. मात्र केवळ एकच विद्यार्थी उपस्थित होता. विद्यार्थ्यांच्या पेट्या भंगारात पडलेल्या आहेत. अपूर्‍या सोयीसुविधांमुळे विद्यार्थ्यांनी आता या आश्रमशाळेकडे पाठ फिरवली आहे. शाळेच्या मागे घनदाट जंगल आहे. इथं वन्यप्राण्यांचा धोकाही आहे. पण कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही. सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे.

या आश्रमशाळेतली मुलं जीव मुठीत घेवून इथं राहतात. पण सुस्त झालेल्या प्रशासनाला हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी जाग येणार हे पाहावे लागेल.

close