सांगलीतलं आधुनिक तुळशीचं लग्न

November 13, 2008 2:38 PM0 commentsViews: 5

13 नोव्हेंबर, सांगलीआसिफ मुर्सल सध्या सगळीकडं तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. खरं तर हा पारंपरिक आणि धार्मिक सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्तानं सांगलीकरांनी पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे. तुळशीच्या लग्नाच्या निराळ्या उपक्रमाविषयी आपल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याविषयी वंदेमातरम ट्रस्टचे मोहन जगताप म्हणाले, "आम्ही घरोघरी जाऊन तुळशीचं रोप देऊन सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे. या विवाहसोहळ्यातून समाजप्रबोधन करण्याचा उद्देश आहे." वंदेमातरम् या सेवाभावी ट्रस्ट नं या विवाहसोहळ्याची अगदी जंगी तयारी केली होती. मंडपात वीजेची रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अंतरपाटापलीकडं उभ्या राहिलेल्या नवरा-नवरीचं रुप मोठं खुलून दिसत होतं. लग्नासाठी मंडपात मोठी गर्दी झाली होती. या विवाहसोहळ्यात शाळकरी मुलांनीही मोठी हजेरी लावली होती. या मुलांची लेझीम, झांज पथकं लक्ष वेधून घेत होती. हे मुलं पर्यावरण बचावाचा संदेश देणारे फलक हातात घेऊन उभे होते. त्यावरून या मुलांमध्ये पर्यवरणाविषयी जाणही दिसत होती.

close