‘ 99 टक्के दहशतवादी हल्ले रोखण्यात यश ‘- राहुल गांधी

July 14, 2011 9:01 AM0 commentsViews: 6

14 जुलैदेशातले 99 टक्के दहशतवादी हल्ले गुप्तचर खात्याच्या सतर्कतेमुळे रोखता आले आहेत, पण 1 टक्का हल्ले रोखता येणं शक्य नाही असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलंय. मुंबईत झालेल्या सिरिअल बॉम्बस्फोटांवर प्रतिक्रिया देताना ओरिसात राहुल यांनी असं म्हटलंय. मुंबईवर झालेले हल्ले हे होतच राहतील. या हल्ल्यांना आपण रोखू शकत नाही, अमेरिका सारख्या देशाने हल्ले रोखू शकला नाही हे त्याचे चांगले उदाहरण आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ला रोखणं कठीण आहे. पण 100 टक्के हल्ले रोखले पाहिजेत असं मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला 24 तासही उलटले नसताना राहुल यांच्या या वक्तव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. यावर शिवसनेने राहुल गांधी यांच्या विधानाची निंदा केली आहे.

close