स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेडचा वापर

July 14, 2011 10:56 AM0 commentsViews: 6

14 जुलै, मुंबई

मुंबईत बुधवारी तीन ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेट वापरल्याची माहिती आयबीएन नेटवर्कला मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. स्फोट घडवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि बॅटरीचाही वापर करण्यात आला होता. जवळपास 1 किलो अमोनियम नायट्रेड ओपेरा हाऊसच्या स्फोटात वापरण्यात आलं. झवेरी बाजारमधील स्फोटात 400-600 ग्रॅम अमोनियम नायट्रेड वापरण्यात आलं. तर दादर इथे झालेल्या स्फोटात 200 ग्रॅम अमोनियम नायट्रेड वापरण्यात आल्याचं समजतं. गुप्तचर यंत्रणांच्या मते या बॉम्बस्फोटांचे मुख्य सूत्रधार इंडियन मुजाहिद्दीन आहे. यापूर्वी इंडियन मुजाहिद्दीननं केलेल्या स्फोटांमध्येही अमोनियम नायट्रेड वापर केला होता.

close