ऐश्वर्याने पुरस्कार नाकारला

July 14, 2011 1:42 PM0 commentsViews: 2

14 जुलै

बुधवारी झालेल्या साखळी बाँबस्फोटाने सगळी मुंबई हादरली आणि त्याचा कमी अधिक परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला. बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय – बच्चन हीचा फ्रेंच सरकारकडून ऐश्वर्याला तिच्या अभिनयाच्या योगदानाबद्दल काल विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जाणार होतं. मात्र तिनं हा सत्कार स्विकारण्याच्या मनस्थितीत आपण नसल्याचे सांगितलं. मात्र सन्मान सोहळ्याच्या संयोजकांच्या आग्रहाखातर सोहळ्याला हजरे लावली. संपूर्ण बच्चन कुटुंबीय यावेळी उपस्थित होतं.

तर दुसरीकडे बॉलिवूडची बरीचशी शूट्स रद्द झाली. शाहरुख खानचा डॉन 2 चा फर्स्ट लूक काल रिलीज होणार होता पण दिग्दर्शक फरहान अख्तरने तो रद्द केला. महेश भट्ट आणि इम्रान हाशमी यांनी मर्डर 2ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानिमित्ताने पार्टी आयोजित केली होती. पण ती देखील रद्द करण्यात आली.

मात्र मुंबईकरांप्रमाणेच मराठी फिल्म इंडस्ट्रीनं आपलं स्पिरिट कायम ठेवलं. बेला शेंडेचा धुंद क्षण या अल्बमचे आज ठरल्याप्रमाणे लॉन्चिंग होतंय. याबरोबरच मराठी सिनेमाचे इतर अनेक शूट्स सुरू आहेत. मुंबईकरांप्रमाणेच काम करतच या बाँबस्फोट पीडितांच्या आणि कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे या कलाकारांनी सांगितलं.

close