एक नजर छत्तीसगड निवडणुकीवर

November 13, 2008 2:51 PM0 commentsViews: 6

13 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगडमधल्या निवडणुका काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी 39 जागा राखीव आहेत. पहिल्या टप्प्यात 14 नोव्हेंबरला 39 जागांसाठी मतदान होत आहे. तर दुसर्‍या टप्प्यात 20 नोव्हेंबरला उरलेल्या 51 जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. सध्या छत्तीसगड विधानसभेत भाजपच्या एकूण 50 जागा आहेत. तर काँग्रेस 37 जागांसहित प्रमुख विरोधी पक्ष आहे. बसपाच्या दोन जागा आहेत, तर राष्ट्रवादीची 1 जागा आहे.पहिल्या टप्प्यात छत्तीसगढचे सध्याचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या जागेचीही समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध राजनंदगांव या मतदारसंघात उदय मुदलियांर हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. छत्तीसगढ विधानसभेचे सभापती भाजपचे प्रेमप्रकाश पांडे यांच्याविरोधात काँग्रेसचे बद्‌द्रुद्दीन कुरेशी यांची लढत होत आहे. तर सध्याचे विरोधी पक्ष नेते महेंद्र कर्मा यांच्याविरोधात भाजपचे भिमराज संडावी उभे आहेत.

close