कलाकारांनी केला टिवट्‌रवर निषेध

July 14, 2011 2:46 PM0 commentsViews: 5

14 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा निषेध बॉलीवूडच्या कलाकारांनी टिवट्‌रवर व्यक्त केला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं दिल्लीमध्ये या स्फोटाचा निषेध करत मुंबईकरांबद्दलची काळजी व्यक्त केली. फ्रेंच सरकारकडून ऐश्वर्याला तिच्या अभिनयाच्या योगदानाबद्दल काल विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जाणार होतं. मात्र तिनं हा सत्कार स्विकारण्याच्या मनस्थितीत आपण नसल्याचे सांगितलं. संपूर्ण बच्चन कुटुंबीय यावेळी उपस्थित होतं.

अमिताभ बच्चनबाँब काय आकाशातून पडत नाहीत, तर आपल्यापैकी काही माणसंच ते ठेवतात. तिच माणसं जी आपल्यासारखंच जगतायेत आणि या मोकळ्या हवेत श्वास घेतायेत, त्यांना पकडा..!

अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते

मुंबईचं स्पिरिट इथल्या लोकंाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. लोकांना आपलं कुटंुब चालवण्यासाठी काम करणं भाग आहे. पण त्यांच्या मनात द्वेश आणि दु:खाची भावना आहे.

बिपाशा बासू, अभिनेत्री

आपण नेहमी आतंकवादी हल्यांचा निषेध करतो आणि ती गोष्ट तिथंच संपतेना संपते, तर पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते. हे लज्जास्पद आहे.प्रियांका चोप्रा, अभिनेत्री

या संकटाला सामोरं जाण्यासाठी मला या क्षणी पुन्हा माझ्या शहरात परतावंसं वाटतंय…मुंबई मेरी जान..!!!!! राम गोपाल वर्मा, फिल्ममेकर

जर राम, येशू आणि अल्लाला शांती हवीये तर मग कोणता देव दहशतवाद निर्माण करतो, आणि जर तो राक्षस असेल तर मग हे तीनही देव त्याला का थांबवू शकत नाही.

close