दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध – पंतप्रधान

July 14, 2011 6:11 PM0 commentsViews: 9

14 जुलै

मुंबईत काल बुधवारी स्फोट झाल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही आहेत. विमानतळावरच पंतप्रधानांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासोबत सुरक्षेसंदर्भातली आढावा बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी सैफी हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल इथं जाऊन जखमींची विचारपूस केली. मुंबईकरांचं दुःख, संताप, त्यांच्या वेदना मी समजू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. भविष्यात अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकार आपली पूर्ण शक्ती पणाला लावेल असं सांगतानाच यातल्या दोषींना कडक शिक्षा केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

close