साईंच्या चरणी सव्वा कोटींचं सोनं अर्पण

July 15, 2011 2:04 PM0 commentsViews: 2

15 जुलै

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनाकरता लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनाकरता रिघ लागली आहेत. गुरुपौर्णिमेला गुरूला काही तरी दान करण्याची परंपरा असल्याने भक्तांनी सव्वा किलो वजनाचे सोन्याचे शिवलिंग, फोटोफ्रेम, सोन्याचा मुकूट, हार, उदबत्ती स्टँड अशा साधारण सव्वा कोटीच्या वस्तू अर्पण केल्या. शिर्डीत गुरूपौर्णिमेचा उत्सव तीन दिवस चालतो त्यातला आजचा मुख्य दिवस आहे. संस्थांनातर्फे भक्तांची राहण्याजेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली.

close