नांदेडला पावसाने झोडपले ; गावांना सतर्कतेचा इशारा

July 15, 2011 11:30 AM0 commentsViews: 1

15 जुलै

नांदेडमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सतत पडणार्‍या पावसाने शहरी आणि ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहराजवळ असलेल्या विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. तर लिंबोटी धरणातला पाणीसाठा 90 टक्कयांवर गेला आहे. शहरी भागांमध्ये श्रीनगर, शिवाजीनगर, भाग्यनगर, दत्तनगर अशा अनेक भागामध्ये घरात पाणी शिरलं आहे. तर ग्रामीण भागात लिंबोटी, गिरगाव, हनमंतवाडी, चोंडी अशा अनेक गावंाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

close