महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दांपत्याचा मृत्यू

July 15, 2011 2:51 PM0 commentsViews: 1

15 जुलै

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे रत्नागिरीतल्या कोटा गावातल्या तरुण शेतकरी पती-पत्नीचा बळी गेला. शेतात काम करत असताना विजेच्या खांबासाठी असलेल्या सपोर्ट तारेत विद्युत प्रवाह आल्यामुळे शॉक लागून या शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.

30 वर्षाचे कमलाकर घडशी आणि 27 वर्षाच्या अंजनी घडशी यांना दोन लहान मुलं आहेत. शेतातून जाणार्‍या 11 केव्ही वीजेच्या तारेचे खांब 35 ते 40 वर्षाचे असून ते गंजलेले आहेत. ते तातडीने बदलावेत अशी मागणी गावकर्‍यांनी वेळोवेळी केली होती.

पण महावितरणाच्या दुर्लक्षामुळे हे खांब अजूनही धोकादायक स्थितीत आहेत. महावितरणाने या घटनेची पूर्ण चौकशी करून नंतरच पूर्ण मदत दिली जाईल असं सांगून केवळ 40 हजाराची तातडीची मदत देऊन हात झटकले आहे. महावितरणच्या या कारभाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

close