ऑपेरा हाऊस येथील स्फोटात कोट्यावधीचे हिरे गायब

July 15, 2011 3:07 PM0 commentsViews: 3

15 जुलै

ऑपेरा हाऊस इथं बुधवारी झालेल्या स्फोटात अनेक हिरे व्यापार्‍यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्याकडे लाखो रुपयांचे हिरे होते. या अपघातात हिरे व्यापार्‍यांचे सुमारे तीस ते चाळीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.या हिरे बाजारात सर्व व्यवहार दलाली वर चालतो. छोठे मोठे दलाल व्यापार्‍यांकडून हिरे घेतात आणि ते दलालीवर विकतात. व्यापारी पंचरत्न अथवा आजूबाजूच्या टॉवरमध्ये कार्यालयात असतात. पण दलाल रस्त्यावर असतात.

येथील प्रत्येक दलालाकडे कमीत कमी वीस पंचवीस लाखाचे हिरे असतात. व्यवहार रस्त्यावरच होतो. मग संध्याकाळी सहा वाजता सर्व व्यापारी , दलाल आपले हिरे प्रसाद चेंबर मधील श्री सरदार लक्ष्मी सेफ लॉकर मध्ये ठेवतात. घटनेच्या वेळी अनेक व्यापारी , दलाल स्वत: जवळचे हिरे सेफ लॉकर मध्ये ठेवायला चालले होते. तेवढ्यात बॉम्बस्फोट झाल्याने व्यापारी, दलाल जखमी झाले आणि त्यांच्याकडे असलेले कोट्यवधी रुपये किमतीचं हिरे ही हवेत उडाले.

close