‘एमसीए’ची खुर्ची विलासरावांकडे

July 16, 2011 1:50 PM0 commentsViews: 4

15 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा पवार-महाडदळकर पॅनेलनं वर्चस्व मिळवलं आहे. 17 जागांपैकी तब्बल 14 उमेदवारी विजयी झाले आहेत. खेळाडूंचा नारा देणार्‍या दिलीप वेंगसरकर पॅनेलचा सपशेल धुव्वा उडाला आहे. अध्यक्षपदी विलासराव देशमुखांनी यांनी 45 मतांनी बाजी मारली आहे. विलासराव देशमुख तब्बल 182 मतांनी विजयी झाले. तर दिलीप वेंगसरकर यांना 135 मतं मिळाली.

शरद पवार यांनी माघार घेतल्याने विलासराव देशमुख आणि दिलीप वेंगसरकर यांच्यात थेट लढत होती. आणि या लढतीला राजकारणी विरुध्द खेळाडू असा रंग मिळाला होता. पण एमसीएवर पुन्हा एकदा राजकीय सत्ता आली आहेत. विलासराव देशमुखांनी दिलीप वेंगसरकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

अध्यक्षपदासाठी ते स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले असले तरी शरद पवार आणि महाडदळकर गटा आणि लालचंद राजपूत पॅनेलचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे त्यांचं पारडं जड होतं. शिवाय आपला सगळा राजकीय अनुभव त्यांनी पणाला लावला होता.

पवार-महाडदळकर पॅनेलचे उमेदवार प्रोफेसर रत्नाकर शेट्टी उपाध्यक्षपदी निवडण आले आहेत. रत्नाकर शेट्टी यांना 195 मतं मिळाली. दुसरं उपाध्यक्षपद विलासरावांचा पाठिंबा लाभलेल्या विजय पाटील यांनी जिंकलं आहे.

close