इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित संशयिताचा शोध

July 16, 2011 10:09 AM0 commentsViews: 2

16 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला आता नवं वळणं लागलं आहे. या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई स्फोटाचा तपास आता कोलकत्त्यापर्यंत जावून पोहचला आहे. इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एक संशयित गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. हा बेपत्ता व्यक्ती कोण आहे ? तो कुठे गायब झाला याचा शोध आता घेतला जात आहे. महाराष्ट्र एटीएस सध्या कोलकत्ता एसटीएफच्या संपर्कात आहे. तसेच एनआयएची एक टीम अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे.

दरम्यान एनआयएची टीमने काल झारखंडमध्ये छापे टाकले होते. 'सिमी' या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित काही लोकांची चौकशी करण्यात आली. यात मंझर इमाम याची चौकशी करण्यात आली. मंझर हा अहमदाबाद बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या दानिश रियाझ याचा मित्र आहे. दानिश सध्या तुरुंगात आहे. स्फोटाचे पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे.

close