नांदेडमध्ये गुरुनानक जयंती उत्साहात साजरी

November 13, 2008 12:55 AM0 commentsViews: 37

13 नोव्हेंबर, नांदेडप्र्रेम,सेवा आणि एकतेचा संदेश देणारे शिखांच्या या पहिल्या गुरूंच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये मोठा उत्सव होता. इथल्या सचखंड गुरुद्वारामध्ये शीख बांधवांनी माथा टेकवला. सोनेरी गुरुद्वाराला आज फुलांनी सजवण्यात आलं होतं. संपूर्ण मानवजातीला प्रेमाचा संदेश देणार्‍या गुरुनानकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची इथे मोठी गर्दी झाली. नांदेडमध्ये नुकताच 5 ते 8 नोव्हेंबर या काळात गुरू-ता-गद्दी सोहळा झाला. त्यामुळे या गुरुनानक जयंतीला विशेष महत्त्व होतं.

close