गव्हावरची निर्यातबंदी उठवली

July 16, 2011 10:19 AM0 commentsViews: 2

16 जुलै

गहू निर्यातीवर चार वर्षांपासून असलेले निर्बंध आता उठवण्यात आल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाला असलेल्या कमी किंमतीमुळे निर्यातीचा खर्च तरी वसूल होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे.

2007 मध्ये देशात पुरेशा प्रमाणात गव्हाचा साठा असावा आणि महागाई नियंत्रण करण्याकरता गहू निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कमी असल्यामुळे सरकारने किती प्रमाणात गहू निर्यात करता येईल हे स्पष्ट केलेलं नाही.

चार वर्ष गहू निर्यात न केल्याने उपलब्ध गव्हाच्या साठ्यासाठीच गोडावून नाहीत त्यामुळे उघड्यावर गहू सडण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. आता गव्हावरची बंदी उठवली तरी किंमतीच्या गोंधळामुळे शेतकर्‍यांना याचा खरोखरच फायदा होणार का हे पाहिलं पाहिजे.

close