स्फोटांमागे संघाचा हात असू शकतो – दिग्विजय सिंग

July 16, 2011 12:18 PM0 commentsViews: 31

16 जुलै

मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर स्फोटामागे संघाचा हात असू शकतो असे वादग्रस्त विधान दिग्विजय सिंग यांनी केले. आरएसएस या स्फोटामागे असण्याची शक्यता असून त्याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईत झालेल्या साखळी स्फोटामागे कोण आहे याचा कसून शोध घेतला जात आहे. या स्फोटाची अजुन ही कोणत्याही संघटनाने जबाबदारी स्विकारली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर स्फोटामागे संघाचा हात असू शकतो असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही सिंग यांनी केली.

close