इतरांनी लुडबूड करू नये – अजित पवार

July 16, 2011 6:05 PM0 commentsViews: 2

16 जुलै

राज्यात बॉम्बस्फोटासारखी घटना घडली असताना इतर राजकीय विषयांना महत्त्व देवू नये असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. काही प्रश्न असल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते तो सोडवण्यास समर्थ आहेत. उगाच इतरांनी त्यात लुडबूड करू नये असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

कालच मुख्यमंत्र्यांनी राज्याचं गृह, अर्थ आणि नियोजन ही खाती मुख्यमंत्र्यांकडेच असायला हवीत इतर राज्यांतल्या आघाडी सरकारमध्ये असं खातेवाटप करण्यात आलं आहे. खातेवाटप करताना याचा विचार व्हायला हवा होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

त्याला आता अजित पवार यांनी उत्तरं दिलं. राज्यात बॉम्बस्फोटासारखी घटना घडली असताना इतर राजकीय विषयांना महत्त्व देवू नये असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. काही प्रश्न असल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते तो सोडवण्यास समर्थ आहेत. उगाच इतरांनी त्यात लुडबूड करू नये आणि चर्चाही करू नये असं सांगत नाव न घेता मुख्यमंत्र्यांना तसेच मीडियालाही टोला मारला त्याच सोबत देशावर हल्ला झाला अशात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे .आमच्यासहीत मीडियानंही त्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे असंही अजितदादांनी बजावलं. असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

close