पंढरपुरात आता साफसफाईचा मुद्दा ऐरणीवर

July 16, 2011 2:29 PM0 commentsViews: 6

16 जुलै

आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यावर आता प्रशासनाला पंढरपूर साफसफाईचे वेध लागला आहे. पंढरपूरमध्ये येणार्‍या भाविकांसाठी प्रशासनाने 1500 सार्वजनिक शौचालये जरी उभारली असली तरी ती लाखो भाविकांना अपुरी पडली. त्यामुळे भाविकांनी शहराच्या आजूबाजूला असणार्‍या आडोशांचा उपयोग शौचासाठी केला.

परिणामी आता शहरभर मानवी विष्ठेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेकडे केवळ 1,100 साफसफाई कर्मचारी आहेत. मानवाकडून विष्ठा उचलणे किंवा डोक्यावरुन मैला वाहणे या कारणावरुन दरवर्षी मानवी हक्क संघटना नगरपरिषदेला वेठीस धरतात. यावर कायमचा तोडगा शोधणे जरुरीचे आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते डुक्करांचा उपयोगही विष्ठेची विल्हेवाट लावण्यासाठी करता येईल.

close