गोकुळ दूध संघाचा दरवाढीचा निर्णय

July 16, 2011 2:05 PM0 commentsViews: 6

16 जुलै

गोकुळ दूध संघाने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी 21 जुलैपासून करण्यात येणार आहे अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी दिली. म्हशीच्या दूधविक्री दरात दोन रुपये तर गाईच्या दूधाच्या विक्री दरात 1 रुपये वाढ करण्यात येणार आहे. विक्री बरोबर खरेदी दरातही गोकुळने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे म्हैशीच्या खरेदी दरात एक रुपये तर गाईच्या खरेदी दरात पन्नास पैशांची वाढ करण्यात येणार आहे.

close